Bajind Marathi Kadambari Pdf Free Download
See a Problem?
Thanks for telling us about the problem.
Friend Reviews
Reader Q&A
Be the first to ask a question about BAJIND
Community Reviews
मुळात ही ऐतिहासिक कादंबरी असली तरी काल्पनिक रहस्यकथा आहे त्यामुळे काही ऐतिहासिक पात्र व प्रसंग यांचा संदर्भ घेऊन कथा पुढे जात रहाते.
आपली फिर्याद घेऊन रायगडावर शिवाजी महाराजांना भेटायलाल निघालेला सखाराम धनगर व त्याचे सहकारी यांना वाटेत बहिर्जी नाईकांचा चेला असलेला खंडोजी भेटतो व त्यांना रायगडावर पोहचवण्यास मदत करतो. त्या प्रवासात शिवाजी महाराज व शि पहिलवान लेखक व ऐतिहासिक कादंबरी हे समीकरण जरा वेगळं वाटले व औत्सुक्य वाटावं असे पुस्तकाचे मुखपृष्ठ पाहुन उत्सुकतेने 'बाजिंद' हे पुस्तक वाचायला घेतलं.
मुळात ही ऐतिहासिक कादंबरी असली तरी काल्पनिक रहस्यकथा आहे त्यामुळे काही ऐतिहासिक पात्र व प्रसंग यांचा संदर्भ घेऊन कथा पुढे जात रहाते.
आपली फिर्याद घेऊन रायगडावर शिवाजी महाराजांना भेटायलाल निघालेला सखाराम धनगर व त्याचे सहकारी यांना वाटेत बहिर्जी नाईकांचा चेला असलेला खंडोजी भेटतो व त्यांना रायगडावर पोहचवण्यास मदत करतो. त्या प्रवासात शिवाजी महाराज व शिर्के यांचे वैर, शिर्के यांची लेक सावित्री व खंडोजी यांची प्रेमकथा, यासारख्या उपकथानकाच्या जोडीने गुंफलेली बाजिंद कादंबरी ऊत्कंठावर्धक आहे.
कुठेही अलंकारीक वा ऐतिहासिक भाषा न वापरता साध्या व ओघवत्या भाषेत लेखकाने कथा लिहिलेली आहे.
पठडीतल्या ऐतिहासिक कादंबर्या सोडुव नवीन लेखकाने लिहिले काहीतरी चांगले वाचायचे असल्यास बाजिंद कादंबरी नक्की वाचावी. ...more
शिवाजी महाराजांनी किशोरवयातच निरनिराळ्या मुस्लिम पातशाहांनी वेढलेल्या मध्ययुगीन भारतात हिंदवी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली. आधुनिक युगात इस्त्राईल देशाने श पै.गणेश मानुगडे लिखित "बाजिंद" ही एक शिवकालीन ऐतिहासिक रहस्यमय कादंबरी होय. लेखकाने पूर्वी आदिलशाहीत सुभेदार असलेले येसोजी शिर्के यांची यशवंतमाची स्वराज्यात सामील होतानाचे ऐतिहासिक संदर्भ घेऊन त्यात ऐतिहासिक तसेच काल्पनिक पात्रांचा आधार घेऊन एक वेगवान कथानक गुंफून शिवरायांचे हेरखात्याचे प्रमुख असलेल्या बहिर्जी नाईक यांना मानाचा मुजरा केला आहे.
शिवाजी महाराजांनी किशोरवयातच निरनिराळ्या मुस्लिम पातशाहांनी वेढलेल्या मध्ययुगीन भारतात हिंदवी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली. आधुनिक युगात इस्त्राईल देशाने शिवाजी महाराजांच्या याच कार्याची प्रेरणा घेत चहुबाजुंनी अरबी राष्ट्रांचा वेढा असूनही स्वतंत्र ज्यू राष्ट्राची निर्मिती करत कायम त्यांना जेरीस आणले. याच देशाच्या सर्वोत्तम हेरखाते असलेली मोसाद ही संघटना शिवरायांना आणि बहिर्जी नाईकांना आपला आदर्श मानीत जगावर ठसा उमटवते. इकडे भारत मात्र एकाच शेजाऱ्याकडून मागील 70 वर्षाहून अधिक काळापासून दहशतवाद सहन करतोय आणि याच भारतात बाणूरगड येथील बहिर्जी नाईकांची समाधी आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहीतही नाही हे आपले दुर्देव.
रायगडावरील टकमक टोकावरून दोषी गुन्हेगारांना खाली फेकण्यात येत होते आणि याचा त्रास पायथ्यावरील एका गावाला होत असल्याने त्या गावाचे कारभारी इतर 3 जणांना सोबत घेऊन महाराजांकडे फिर्याद मागायला रायगडावर निघतात. या प्रवासात त्यांना बहिर्जींचे खास खंडोजी आणि सावित्री भेटतात. ते दोघे मिळून त्यांना स्वतःची आणि बाजिंदची गोष्ट सांगतात. अशी पुस्तकाची एकूण कथा आहे.
यात दोन प्रेमउपकथाही आहेत; खंडोजी आणि सावित्रीची तसेच बाजींद आणि नूरजहाँ यांची. काही प्रसंग आपल्याला वाचताना अद्भुत वा फँटसी वाटतात पण पुस्तकाच्या शेवटच्या काही प्रकरणात त्याचे स्पष्टीकरण देऊन त्याला पूर्णविराम दिला आहे. लेखकाची कथा मांडण्याची पद्धत, ऐतिहासिक आणि काल्पनिक गोष्टीचा केलेला उत्तम संगम तसेच एखाद्या सस्पेन्स चित्रपटाला शोभावी असा शेवट या पुस्तकाच्या जमेच्या बाजू आहेत.
काही प्रसंग थोडे फिल्मी वाटतात, त्याला आपण दुर्लक्षित करून कादंबरीतील मनोरंजनाचा पूर्णपणे आस्वाद घेऊ शकतो. ...more
Gives an idea about secret operations of Hindwi swarajya and with a catchy storyline. Full of twists and suspense. must read for those interested in History of Maharashtra.
काही शिवकालीन घटना अंगावर रोमांच उठवतात. तशेच शिवरायांचे गुप्तहेर खाते कशाप्रकारे काम करायचे याचं अनुभव आपल्याला ह्या कादंबरी मधून घेता येतो. प्रत्यकाने आवर्जून वाचावे अशी कादंबरी
धन्यवाद.
Unexpolred stories of Chhatrapati Shivaji Maharaj. Many questions, mysteries, stories in between stories, worth reading, Manacha Mujra, Bajind Bajind Bajind
This is very excellent book... is a wonderful experience Bajind bajind... bahirji naik... is a great man ... har har mahadev
It was a real thriller till the last page of the book. Amazing and wonderful indeed. Will read it once again.
News & Interviews
Welcome back. Just a moment while we sign you in to your Goodreads account.
Source: https://www.goodreads.com/book/show/34865337-bajind
Posted by: marvellamarvellapaulmane0271051.blogspot.com
Post a Comment for "Bajind Marathi Kadambari Pdf Free Download"